सोलापूर :अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड मुली शाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी भेट देऊन बांधकामाची पाहणी केली व शाळेच्या स्वच्छतागृहासाठी अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन दिले.
मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड मुली या शाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी बुधवारी अचानक धावती भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी मुलींच्या शाळेचे स्वच्छतागृह, स्वयंपाकग्रह, वर्ग खोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा व मध्यान भोजनाचा स्वाद आदी ठिकाणी भेट देऊन बांधकामाचे निरीक्षण केले. तसेच मुलींची गुणवत्ता व गणवेश याही गोष्टी त्यांनी लक्षपूर्वक निरीक्षण केल्या. यानंतर नवीन खोली बांधकामाचे निरीक्षण केले. यावेळी अक्कलकोटचे बांधकाम विभागाचे उपाधियंता उषा भिडला, शाखा अभियंता रविशंकर बोधले उपस्थित होते
मुलींचे स्वच्छतागृह निरीक्षण केल्यानंतर सोबत असलेले अक्कलकोटचे पंचायत समितीचे कार्यालय निरीक्षक दयानंद परिचारक यांना गटविकास अधिकाऱ्यांकडून मुलींचे स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करा अशा सूचना केल्या. शाळेचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी अतिरिक्त सीईओ संदीप कोयंकर यांचे स्वागत केले व शाळेच्या कामकाजाबाबत माहिती दिली.