सोलापूर : दिवाळीची धामधूम सुरू असताना ऐन भाऊ विजेच्या दिवशी सोलापुरात एका पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. गेल्या महिन्यात नांदेड येथे कार्यरत असलेल्या साहेब पोलीस निरीक्षकाने गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
राहुल सिरसट असे त्या आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव असल्याचे सांगण्यात आले. त्याची नेमणूक पोलीस मुख्यालयात होती. अज्ञात कारणावरून त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. त्यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.