सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी एकूण 57.09 टक्के मतदान झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदार असून आज सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 21 लाख 97 हजार 236 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये पुरुष मतदार अकरा लाख तीस हजार 906, स्त्री मतदार दहा लाख 66 हजार 231 तृतीयपंथी 69 मतदाराने मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी 57.09% झालेली आहे. विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे.
244 करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख 94 हजार 10 मतदारांनी मतदान केले (58.57%).
245 माढा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख चार हजार 541 मतदारांनी मतदान केले, 57.99%.
246 बार्शी विधानसभा मतदारसंघात दोन लाख दहा हजार 860 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी 62.48%.
247 मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात एक लाख 98 हजार 338 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 59.84% आहे.
248 सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख 68 हजार 29 मतदारांनी मतदान केले असून 51. 49 टक्के मतदान झालेले आहे.
249 सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 11937 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी 49.60% आहे.
250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 20262 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 58.48% आहे.
251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख 98 हजार 790 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 51.94 टक्के आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 2 हजार 446 मतदारांनी मतदान केलेले आहे. मतदानाची टक्केवारी 54.18.
253 सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण 2,14,423 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 64.30% आहे.
254 माळशिरस अनुसूचित जाती मतदार संघात एकूण दोन लाख नऊ हजार चारशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्या असून मतदानाची सरासरी टक्केवारी 59.90% आहे.
65.41% मतदान
जिल्ह्यात ११ विधानसभेसाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.४१ टक्के मतदान झाले.