मुंबई; मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेले दीड महिना पाऊस नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पेरणी झालेल्या क्षेत्रावरील खरीप पिके करपून जात असतानाच आता या अंदाजामुळे परतीचा पाऊस धो धो बरसतो की काय? अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिले आहे.
🌨️११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
🌨️१२ सप्टेंबर रोजी धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व विजांची शक्यता आहे.
🌨️१३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
🌨️१४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

More Stories
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध
पंढरपूर एमएसईबीच्या अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश