February 1, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

अजितदादा अनंतात विलीन; काटेवाडीत उसळला जनसागर

सोलापूर : विमान अपघातात निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामती जवळील काठेवाडी या त्यांच्या मूळगावी गुरुवार दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी आपल्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी देशभरातून जनसागर उसळला होता.

बारामती येथे 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघात झाला. या अपघातात विमानातून प्रवास करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, पायलट यांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या मृत्यूची वार्ता देशभर हा हा म्हणता पसरली. देशभर या अपघाताची चर्चा सुरू झाली. या घटनेनंतर  ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित दादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे धाव घेतली. पवार कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बारामती धाव घेऊन पवार कुटुंबीयांना धीर दिला. गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी काठेवाडी येथे अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. अनेकांना अजितदादाना अंतिम निरोप देताना अश्रू अनावर झाले. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन नवीन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत , छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राहुल नार्वेकर यांच्यासह देशभरातील मान्यवर नेते उपस्थित होते.

वैमानिकची चूक…

बारामतीतील विमान अपघातानंतर देशभर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. काहींनी घातपाताची शंका व्यक्त केली. मात्र केंद्रीय विमान प्राधिकरणच्या अधिकाऱ्याने ही वैमानिकाची चूक असल्याचे म्हटले आहे. अपघातग्रस्त विमानात चौदाशे लेटर इंधन होते. हे विमान मुंबईहून बारामती ल पोहोचल्यानंतर धुक्यामुळे पहिल्या प्रयत्नात लँड होऊ शकले नाही. वैमानिकाने दुसऱ्यांदा विमान लँड करण्यासाठी प्रयत्न केला. पण वेग जास्त असल्याने वळण घेत असतानाच विमान खाली कोसळले. उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे.