सोलापूर : सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या व्यस्ततेतही सोलापूर शहराच्या विकासकामांना प्राधान्य देत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत बैठका घेतल्या. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी राज्याच्या नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांच्या समवेत बैठक घेतली. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना जागतिक बँकेकडे अंतिम मंजुरीसाठी आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांच्या समवेत चर्चा केली. यावेळी यातील त्रुटींची पूर्तता करून १५ जुलैपूर्वी महाराष्ट्र शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन डॉ. गोविंद राज यांनी दिले.
सोलापूर शहरासाठी केंद्र शासनाकडून १०० ई बस मंजूर करण्यात आल्या आहेत. या बस लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी अनेकदा सभागृहात केली आहे. कंपनीशी करार पूर्ण झाला असून वाहनतळाचे काम देखील पूर्ण झाले आहे. मात्र तरीदेखील सोलापूर शहराला बस मिळण्यामध्ये दिरंगाई होत असल्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत पाठपुरावा करण्यासाठी डॉ. के. एच. गोविंदराज यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी आपण मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. १५ ऑगस्ट पूर्वी शहराला किमान २५ बस देण्यात येतील, असे आश्वासनही अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांनी याप्रसंगी दिले.
पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या फाईलमधील त्रुटी वर्षभरापासून पूर्ण करून ती फाईल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली आहे. या फाईलला केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी याकरिता नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी यांनी यावेळी केली. त्यांच्या या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर शहर विकासाचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांनी याप्रसंगी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर शहरावर विशेष प्रेम आहे. सोलापूर शहराच्या विकासाचा कोणताही प्रकल्प रखडू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वैयक्तिक लक्ष दिलेले आहे. सोलापूर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमच्या पाठीशी भक्कमपणे असल्यामुळे प्रलंबित विकास प्रकल्प न रखडता त्यांना गती मिळेल असा पूर्ण विश्वास आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, सोलापूर शहर मध्य

More Stories
शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची खरी प्रगती : दीपक वैद्य
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना पदोन्नती देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
अक्कलकोट: शाळेवर शिक्षणाधिकारी, विद्यार्थी हजर पण शिक्षकच गायब