September 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपीच्या गुरुजीचा आत्मदहनाचा इशारा; कारण ऐकून तुम्ही व्हाल चकित

सोलापूर ; अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेले अक्कलकोटचे गटशिक्षण अधिकारी परमेश्वर आरबाळे यांच्या बदलीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा मुख्याध्यापक व मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

अक्कलकोट तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे.  पदभार  घेतल्यापासून त्यांनी अनेक  वेळा विभागीय आयुक्त पुणे यांचे अधिकार वापरून मनमानी कारभार करून शिक्षकांच्या प्रति नियुक्ती केल्या आहेत, या विरोधात 2024 सप्टेंबर मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्या तक्रारीच्या अनुसरून तत्काालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी चौकशी समिती नेमून चौकशी केली. या चौकशीचा अहवाल 16 जानेवारी 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर आतापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी पाठवलेली फाईल शिक्षण विभागकडे परत आलेले नाही. तब्बल एक वर्ष झाले तरी ही फाईल मुख्य कार्यकारी अधिकारीकडे प्ररलंबित आहे.

वारंवार उपोषण करूनही गटशिक्षणाधिकारी आरबाळे यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यांच्यावरोधात महिला शिक्षक यांचे तक्रारी आहेत, त्या तक्रारीवरही अद्याप निर्णय झालेला नाही. आता तर पंचायत समितीचे सदस्य ही त्यांच्या कारभाराविरोधात गेले आहेत. आरबाळे यांच्या कृतीमुळे अक्कलकोट तालुका शिक्षण विभागावर मोठा परिणाम झाला आहे. तरीसुद्धा आर्बळे यांच्या विरोधात भरपूर पुरावा देऊन सुद्धा कारवाई का होत नाही. 2 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्याबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा परिषदसमोर आत्मदहन करणार असल्याचे मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी निवेदनात नमूद केले आहे.