सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील हे रविवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सोलापुरात प्रथमच दौऱ्यावर येत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील काही जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले. त्यात सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याजागी चंद्रकांतदादा पाटील यांचे नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा रविवारी पहिल्यांदाच दौरा होणार आहे. रविवारी पुण्याहून मोटारीने ते सायंकाळी सोलापुरात येतील. रात्री ते मुक्कामी राहणार आहेत. सोमवार दिवसभर विविध शासकीय यंत्रणाचा आढावा ते घेणार आहेत. यामध्ये महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, राज्य उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम खाते, सिव्हिल हॉस्पिटल, सार्वजनिक आरोग्य व इतर विभागांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली प्रशासकीय कामे व प्रस्तावित कामांचा आढावा घेऊन त्याला गती देण्यासाठी पालकमंत्र्यांनी ही आढावा बैठक ठेवल्याचे सांगण्यात आले. पहिल्या दौऱ्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना ही सूचना दिल्या आहेत. कोणीही स्वागतासाठी गर्दी, स्वागत समारंभ करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.