सोलापूरजिल्हा परिषद

तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या

सोलापूर : अलीकडच्या काळात शेतातील रस्त्यावर बैलगाड्या दिसत नाहीत पण बैल व बैलगाडीच्या आकर्षण प्रत्येकाला आहे. घरात शोकेसमध्ये बैलगाडी ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. अशाच वस्तू तुम्हाला आता रुक्मिणी महोत्सवात मिळणार आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मार्फत महिला स्वयंसहायता समूहाचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण करण्यासाठी एक ते पाच मार्च या कालावधीत नारकोट मैदानावर रुक्मिणी महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. मागील दोन वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषदेला पुणे विभागात हा मान मिळाला आहे. रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन एक मार्च रोजी दुपारी एक वाजता ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची निर्मिती व विक्रीला अधिकाधिक प्रोत्साहित करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील विविध वस्तू पदार्थ व स्वादिष्ट खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे. या प्रदर्शनात एकूण 75 स्टॉल असणार आहेत या स्टॉलमध्ये सोलापूरची क** भाकरी शेंगा चटणी दुग्धजन्य पदार्थ हस्तकला वस्तू लाकडी बैलगाडी खेळणी कापडी पिशवी लोकरी जैन घोंगडी मिलिट पदार्थ कुकीज मसाले कोल्हापुरी चप्पल सेंद्रिय डाळी बंजारा आर्ट फळे व भाजीपाला लोकरी अशी उत्पादने असणार आहेत. खवय्यासाठी उजनी धरणातील मासे, खेकडा, बिर्याणी व पंढरपूरची बाजार आमटी खायला मिळणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये सोलापूरकरांना ग्रामीण भागातील विविध दुर्मिळ वस्तू खरेदी करता येणार आहेत. तसेच दररोज सायंकाळी बचत गटाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आनंद घेता येणार आहे. सोलापुरात वर्षातून होणाऱ्या या प्रदर्शनाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहेत. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जगताप उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button