शेतकऱ्यांसाठी खुशखबर… आता ‘या” योजनेतून मिळणार बिनव्याजी ट्रॅक्टर
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने सुरू केली पुन्हा ट्रॅक्टर कर्ज योजना

सोलापूर : दिवाळीच्या सणामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ही आनंदाची बातमी आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने पुन्हा ट्रॅक्टर कर्ज परतावा योजना सुरू केली आहे.
मराठा समाजातील सुशिक्षित बेकार तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाने एक लाख तरुण उद्योजक बनवण्याचे उद्दिष्ट घेऊन काम सुरू केले आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाने कर्ज परतावा योजनेद्वारे कोट्यावधी रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. योजना सुरू केल्यावर मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या मुलांनी ट्रॅक्टरसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले होते. त्यामुळे ट्रॅक्टरची योजना बंद करण्यात आली होती. आता पुन्हा ट्रॅक्टरसाठी महामंडळाने कर्ज परतावा देण्यास सुरुवात केल्याचे बाळे येथील टॅफे ट्रॅक्टरचे वितरक परेश पाटील यांनी सांगितले. योजनेचे लाभार्थी वाढवण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे व्यवस्थापक नीलेश वाघ व त्यांची टीम प्रयत्नशील आहे. बँक ऑफ इंडियाने अण्णासाहेब महामंडळाबरोबर करार केलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकमंगल, शरद नागरी या कॉपरेटिव्ह क्षेत्रातील बँकांनीही या योजनेतील लाभार्थ्यांना कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेतून ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज घेण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी 👇 हे वाचा…