सोलापूरजिल्हा परिषदसंघटना-संस्था

महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी दयानंद परिचारक यांची निवड

सोलापूर: महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी दयानंद परिचारक यांची एकमताने निवड करण्यात आली.

जिल्हा परिषद कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य बाबुराव पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विसावा विश्रामगृह सोलापूर येथे सभा पार पडली. महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी दयानंद परिचारक व महिला अध्यक्षपदी मृणालिनी शिंदे, कार्याध्यक्षपदी अनुक्रमे शिवाजी राठोड व स्वाती स्वामी तसेच उपाध्यक्षपदी अनुक्रमे विशाल घोगरे व सविता काळे यांची निवड करण्यात आली यावेळी श्रीधर कलशेट्टी, अनिल बिराजदार, डॉ. एस. पी. माने, श्रीशैल देशमुख, शहाजान तांबोळी, चेतन वाघमारे, नितीन शिंदे, महेश केंद्रे, योगेश हब्बू , किरण लालबोंद्रे, अजय भोसले, अभिमन्यू कांबळे, भीमाशंकर वाले, दत्ता गुरव, योगेश कटकधोंड, उमेश खंडागळे, राजगुरू, गोदावरी राठोड, निर्मला राठोड, आरती माडेकर इत्यादी उपस्थित होते. यावेळी बोलताना दयानंद परिचारक यांनी कर्मचाऱ्यांचे हक्क व आत्मसन्मान राखण्यात येईल, असे अभिवचन दिले. तसेच कै विवेकानंद लिंगराज यांच्या विचाराप्रमाणेच कामकाज करू. सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, मागण्या मांडू. वेळ पडल्यास प्रशासनाची भांडु असे मनोगत व्यक्त केले. परिचारक यांच्या निवडीबद्दल महासंघाचे राजेश देशपांडे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button