सोलापूर

शिवकालीन तलवार, ढाल, भाला, बरची पाहून आले अंगावर रोमांच

सोलापूर : जुळे सोलापुरात आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास शहरातील हजारो नागरिकांनी भेट देऊन माहिती घेतली. शिवकालीन दुर्मिळ शस्त्र पाहून अनेकांच्या अंगावर रोमांच उभारले तर हे दुर्मिळ शस्त्र आपल्याजवळ माहितीसाठी साठवून ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या मोबाईलमधील कॅमेरा उघडला.

गोकुळ दूध आयोजित शिवकालीन ५०० शस्त्रांचे मोफत प्रदर्शन सोलापूरकरांसाठी जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये भरविण्यात आले होते. दि.५ व ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ८ वाजे पर्यंत या कालावधीत घेण्यात आलेल्या या दुर्मिळ शस्त्र व इतिहास कालीन वस्तूंचा फार मोठे संकलन या प्रदर्शनात नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते.
या शस्त्र प्रदर्शनात धोप तलवार, जाफराबादी तलवार, मराठा तलवार, मोगल तलवार, रजपूत तलवार, इंग्रज तलवार, फिरंगी तलवार, खांडा तलवार, तेगा तलवार व इतर प्रकारच्या तलवारी, मराठा कट्यार, मोगल कट्यार, बच्चा कट्यार व सैनिकी कट्यार. दिल्ली शाही कट्यार व विजयनगरी कट्यार, हत्तीच्या काताड्याची ढाल, कासवाच्या पाठीची ढाल, लोखंडी ढाल, व धातूंची ढाल, तोफेचे दगडी गोळे, खंजीर, बिचवा, जांबिया, कुकरी, अडकित्ते, दरबारी भाला, पायदळ भाला, घोडेस्वार भाला, अश्वकुंज भाला व सांग भाला, विटा, शिरस्थान, अंकुश, शिक्षा देण्याची कुऱ्हाड, फरशी कुऱ्हाड, गुप्ती, चिलमन , ऐतिहासिक व इतर प्रकारचे कुलूप अशी अनेक प्रकारचे शस्त्र होती.  जुन्या काळातील इतर वस्तू या ठिकाणी सर्वाना पाहण्यास मिळाल्या. दोन दिवसांच्या कालावधीत  करियर अकॅडमी,ज्ञानसंपदा प्रशाला,भारतीय विद्यापीठ हायस्कुल,जय जवान जय किसान हायस्कूल, छत्रपती शिवाजी शाळा,  सोनामाता शिक्षण संस्था,  मेहता माध्यमिक शाळा, एस पी शिक्षण मंडळ, नूतन मराठी शाळा, मनपा प्राथमिक माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग, भैरूरतन दमानी अंधशाळा, सुरवसे हायस्कूल, अण्णासाहेब पाटील प्रशाला, स्व. चंद्राम गुरुजी शिक्षण संस्था, हरीभाई देवकरण प्रशाला, शरदचंद्र पवार हायस्कूल, छत्रपती शिवाजी प्रशाला, शांती इंग्लिश मीडियम स्कूल, आप्पासाहेब कादाडी चित्रकला महाविद्यालय, संगमेश्वर जूनियर व सिनियर महाविद्यालय, यशोधरा हायस्कूल व महाविद्यालय, वसुंधरा प्राथमिक व माध्यमिक प्रशाला अशा विविध शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील मुले, मुली, शिक्षक व सामान्य नागरिक, खेळाडू, विविध क्षेत्रातील व्यापारी , सार्वजनिक मंडळ व सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने या प्रदर्शनात सहभागी होऊन दुर्मिळ अशा शस्त्रांचा संकलन पाहून आनंद व्यक्त केला. या प्रदर्शनाचा समारोह भाले बाजीचा व तलवारबाजीचं प्रात्यक्षिक व लहान मुलांच्या शिवगर्जनेतून करण्यात आला .

या समारोपप्रसंगी पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे,राज्य बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता मुळे, पावनखिंड चित्रपटात मधील कलाकार उदय वळसंगे व प्रदर्शनासाठी आलेले सोलापूरकर उपस्थित होते. या  प्रदर्शनाचे संयोजन रवी मोहिते यांनी केले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रदीप वानखेडे , विशाल गायकवाड, मनमोहन चोपडे ,संतोष घोडके ,विकास कदम ,चेतन चौधरी ,श्याम कदम ,मनीष सूर्यवंशी, मनोज देवकर,आकाश काटकर, तुषार मागाडे ,पोपट भोसले, उदय पाटील यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button