सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या पुढाकाराने जुळे सोलापुरात आयोजित केलेल्या ताई चषक मॉडेल क्रिकेट अकादमीने पटकावला आहे. ताई चषकच्या माध्यमातून काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेसाठी वातावरण निर्मिती केली आहे.
ताई चषकाचे पहिले बक्षीस पटकावलेल्या मॉडेल क्रिकेट अकादमीला 51 हजाराचे बक्षीस माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, हरीश पाटील, सिद्धू पाटील, माजी नगरसेवक विनोद भोसले, शिवा बाटलीवाला, मोतीलाल राठोड, श्रीशैल रणधिरे, मधुकर आठवले, सुभाष पाटोळे, जयकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
जुळे सोलापूर आतील भंडारी मैदानावर झालेल्या या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन 5 डिसेंबर रोजी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले होते. आमदार प्रणिती शिंदे यांनी या सामन्याला भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले होते. स्पर्धेचे नियोजन युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे व सुदर्शन हसापुरे यांनी केले. जुळे सोलापुरात पहिल्यांदाच लेदर बॉलची स्पर्धा व मोठ्या प्रमाणावर बक्षीसे ठेवण्यात आल्यामुळे मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस जोरात साजरा करण्यात आला. निम्बर्गीचे सरपंच श्रीदिप हसापुरे यांनीही विविध उपक्रमासाठी पुढाकार घेतला. वाढदिवसाच्या औचित्य साधून खो खो, कबड्डी स्पर्धा, साडया, चादर, ब्लॅंकेट वाटप, रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रम हाती घेतले होते.ताई चषकचे दोन नंबरचे बक्षीस दिपक सी सी यांना मिळाले. या स्पर्धेच्या माध्यमातून जुळे सोलापूर परिसरात मोठे पोस्टर व कमानी लावण्यात आल्यामुळे वातावरण निर्मिती झाली. आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यानी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सात रस्त्यापासून दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वत्र बॅनरबाजी केल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे. क्रिकेट स्पर्धा व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसने प्रथमच जुळे सोलापुरात एंट्री मारली आहे. भाजपला जुळे सोलापूरची साथ मिळाल्यामुळे महापालिकेत सत्ता आणता आली. हेच गणित हेरून आता हसापुरे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा काबीज करण्यासाठी जुळे सोलापुरात एन्ट्री मारत काँग्रेसला लोकसभा, विधानसभा व महापालिकेला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रथमच जोरदार प्रयत्न केला आहे. काँग्रेसची ही एन्ट्री भाजपला भविष्यात नक्कीच डोकेदुखी ठरणारअसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
Tags: #congres solapur

More Stories
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार