सोलापूर : माढा तालुक्यातील अरण येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
अरण येथील पंढरपूर पालखी मार्गावरील धोंडीराम मराळ यांच्या वस्तीवर तिघा चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी वस्तीवरील लोक जागे झाल्यामुळे त्यांनी चार जणांना मारहाण केली.. मराळ वस्तीवरील लोकांनी प्रतिकार केला, परंतु चोरट्यांकडे चाकू व टॉमी अशी शस्त्रे असल्यामुळे त्यांनी हातावर डोक्यात मारून लोकांना जखमी केले. यामध्ये रोहित उत्तम मराळ,पांडुरंग श्रीरंग मराळ,उत्तम पांडुरंग मराळ,कलावती खंडू मराळ,
इत्यादी लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनी दिली आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली आहे.
अरण येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात चार जण जखमी

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध