March 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपीचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

सोलापूर : जिल्हा परिषदेतर्फे गेल्या दोन वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर आर आर (आबा) पाटील सुंदर गावांची घोषणा झाली असून माढा तालुक्यातील वडाचीवाडी आऊ जिल्ह्यातील सर्वात सुंदर गाव ठरले आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पंढरपुरातील यश पॅलेसमध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व आर. आर. (आबा) पाटील सुंदर गावांच्या पुरस्काराचे वितरण होणार आहे. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार गेल्या दोन वर्षाचे आहेत तर आर. आर. आबा सुंदर गाव स्पर्धेत तालुक्यातील गावाला दहा लाखाचे तर जिल्हास्तरीय गावाला चाळीस लाखाचे बक्षीस मिळाले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले आहे.

असे आहेत आदर्श ग्रामसेवक…

आर आर पाटील सुंदर गाव