सोलापूर : दक्षिण सोलापुरातील मंद्रूप येथे रॉडने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी घडली.
अमोगसिद्ध बसप्पा व्हनमाने (वय 45, रा. विंचूर, तालुका दक्षिण सोलापूर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मंद्रूप येथे मामाकडे आला होता. मामाच्या घरासमोर मोबाईल बघत बसलेला असताना पाठीमागून केदार शेंडगे हा आला व त्याने सोबत आणलेल्या रॉडने हल्ला केला. डोक्यात, मानेवर व गालावर रॉडचा तडाखा बसल्याने अमोगसिद्ध हा गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाईक मदगोंडा यांनी उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्रास वाढल्याने पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. सोलापूर तालुका पोलिसांनी रुग्णालयात येऊन नातेवाईकाकडून माहिती घेतली व प्रकरण पुढील चौकशीसाठी मंद्रूप पोलीस ठाण्याला वर्ग केले आहे. जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि हॉस्पिटलच्या MLC रिपोर्टनुसार, केदार शेंडगे या तरुणाने जुन्या वादातून डोक्यात रॉडने मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. संशयित आरोपी केदार याने यापूर्वी अशाच पद्धतीने अनेकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.

More Stories
सोलापूर जिल्हा परिषदेचा अजब कारभार; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा पेन्शन प्रस्ताव ३ महिने प्रलंबित
कानडी भागात सुरू केलेल्या स्पोकन इंग्लिश उपक्रमाचे सीईओ कुशल जैन यांनी केले कौतुक
गरोदर माता, झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घेतोय जिल्हा आरोग्य विभाग