सोलापूर : समाजातील अनिष्ट प्रथा, रुढींवर आसूड ओढणारे व स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे महान समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. संत गाडगे महाराज जयंतीच्या औचित्य साधून दिंडूर  येथे स्वच्छतेचा जागर करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता सामान्य प्रशासन विभागांच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याहस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी लेखाधिकारी रूपाली रोकडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, अधीक्षक विवेक लिंगराज, वरिष्ठ सहाय्यक संतोष जाधव, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, घन कचरा सल्लागार मुकूंद आकुडे, प्रशांत दबडे, संपादणूक समन्वयक अर्चना कणकी, अल्फिया बिराजदार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांनी परिसर स्वच्छता करून संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी केली. जिल्ह्यात पंचायत
समितीस्तरावर तसेच ग्रामपंचायतस्तरावर संत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *