सोलापूर : मला कन्नड बोलता येत नाही, मी तुमच्या घरातील लेक असून लोकसभा निवडणुकीला उभी राहिले आहे, असे म्हणत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी या निवडणुकीत मतदान करताना फक्त ‘हात: लक्षात ठेवा, असे भावनिक आवाहन केले.
आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी गुरुवारी सकाळपासून दक्षिण तालुक्यात दौरा केला. हिपळे येथून त्यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. कणबस येथे गावातील महिलांनी त्यांना ओवाळून सत्कार केला. त्यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या ‘ननग कन्नड बरंगीला, इदू कई ध्यानदाग ईडरी’ असे म्हणत त्याने आपला ‘हात” उंचावला. त्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या सध्या महागाई वाढली आहे, गॅस 1200 रुपये झाला, पेट्रोल रेट वाढले, शेतकरी यांचे हाल होत आहेत. जीएसटीने भरपूर त्रास होतोय. भाजपच्या लोकांनी राजकारण करून चिमणी पाडकाम करुन सिद्धेश्वर कारखाना बंद पाडला. मी काम करणारी आमदार आहे. तीन वेळेस मी ‘मध्य” मधे निवडुन आली आहे. मी कामाची पक्की आहे. मी जात पात बघत नाही, त्यामुळे तुमच्या कामाची माणसे तुम्ही निवडून द्या, असे आवाहन केले.
दक्षिण सोलापूर आतील दौऱ्यात आमदार प्रणिती शिंदे यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. या दौऱ्याचे नियोजन काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, तालुकाध्यक्ष हरीष पाटील यांनी चांगल्या प्रकारे केले होते. या दौऱ्यात माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, बाळासाहेब शेळके, सुभाष पाटोळे, अंनत म्हेत्रे, जयशंकर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकरी उपस्थित होते