सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सरासरी एकूण 67.72 टक्के मतदान झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. दरम्यान 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून कोणत्या ठिकाणी होणार आहे याची माहिती शेवटी दिली आहे.
जिल्ह्यात एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदार असून 26 लाख 6 हजार 571 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये पुरुष मतदार 13 लाख 66 हजार 588, स्त्री मतदार 12 लाख 39 हजार 868 तर तृतीयपंथी 115 मतदाराने मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी 67.72 % झालेली आहे.
विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे…..
244 करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 29 हजार 375 मतदारांनी मतदान केले (69.72%).
245 माढा विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 67 हजार 691 मतदारांनी मतदान केले असून 75.90% टक्के मतदान झाले.
246 बार्शी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 46 हजार 712 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी 73.10%.
247 मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात 2 लाख 30 हजार 850 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 69.65% आहे.
248 सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 91 हजार 394 मतदारांनी मतदान केले असून 58.25 टक्के मतदान झालेले आहे.
249 सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 291 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी 57.77% आहे.
250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 55 हजार 26 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 66.50% आहे.
251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 23 हजार 624 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 58.42 टक्के आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 59 हजार 744 मतदारांनी मतदान केलेले आहे. मतदानाची टक्केवारी 69.51.
253 सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 61 हजार 13 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 78.27 % आहे.
254 माळशिरस अनुसूचित जाती मतदार संघात एकूण 2 लाख 40 हजार 851 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची सरासरी टक्केवारी 67.72 आहे.