सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे सोमवारी दुपारी चार वाजता जोरदार अवकाळी पाऊस झाला या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. बऱ्याच वर्षानंतर अवकाळी बरसल्याने पावसाळ्यात याचा उपयोग होणार असल्याचे जाणकार शेतकरी सांगत आहेत.
मंद्रूप परिसरात गतवर्षाच्या पावसाळी हंगामात सखल भागातून पाणी वाहील असा पाऊस झालाच नव्हता.त्यामुळे त्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक जाणवत आहे विहिरीचे पाणी तळाशी गेले आहे तर बरेचसे बोर आटले आहेत त्यामुळे वाड्यावर पिण्याचे पाणीटंचाई जाणवत आहे. उचक्या मारणाऱ्या बोरमधून पिण्यासाठी कसेबसे बॅरल भर पाणी मिळवून शेतकरी दिवस काढत असतानाच गेल्या तीन दिवसापासून ढग भरून पाऊस येत आहे दोन दिवसांपूर्वी पहाटे जोरदार पाऊस झाला त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते त्यानंतर सोमवारी दुपारी चार वाजता पुन्हा ढग भरून आले व वादळी वाऱ्यासह जोरदार तासभर पाऊस पडला या पावसाने शेतात व सखल भागातून पाणी वाहत असून हवेत गारवा निर्माण झाला आहे चाऱ्याची टंचाई निर्माण झालेले असतानाच भर उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल महिन्यात बांधावर हिरवळ दिसू लागली आहे यामुळे शेळ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
सोलापूर शहरात ही सोमवारी सायंकाळी पाच वाजता जोरदार वादळी वारे सुटले होते त्यानंतर पावणेसहा वाजता पावसाला सुरुवात झाली. शहरातील बऱ्याच भागात रिमझिम पाऊस झाला. जिल्हाभर अवकाळी पावसाचे हजेरी लागत आहे दिवसभर कडाक्याचे ऊन आणि सायंकाळनंतर पावसाची हजेरी लागत असल्याने गारवा निर्माण होण्याऐवजी हवेत कमालीचा उकाडा जाणवत आहे त्यामुळे या विचित्र हवामानांपासून बचाव करण्यासाठी लोकांना कुलर पंखे एसी चा आधार घ्यावा लागत आहे वादळी वारे व अवकाळी पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे लोकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांना कार्यकर्त्यांची चणचण भासत आहे. अशात ढगाळी हवामानामुळे उमेदवारांना प्रचार करण्यास चांगल्या वातावरणाची निर्मिती झाली आहे.

More Stories
झेडपी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीचा आज मोर्चा
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी