सोलापूर : शहरातील विजापूर रोड परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षीय मुलीसह रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सुशीलनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
वर्षा पांडुरंग अधटराव (वय 33) व स्वरा पांडुरंग अधटराव (वय 14, रा. सुशील नगर, सैफुल, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोलापूर–टिकेकरवाडी रेल्वे मार्गावरील इलेक्ट्रिक पोल क्रमांक 458/3C जवळ रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास दोघी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे हवालदार जी. एस. मणुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघींना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच या दोघींचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आईने मुलीसह हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध