सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू असून सोलापूरची लेक म्हणून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मरीआई चौकातील एक्झिब्युशन ग्राउंड येथे दुपारी 3 वाजता होणार आहे.या भव्य जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून आज रोजी स्टेजचे पूजन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, राज सलगर उपस्थित होते.

More Stories
आषाढी वारी काळात दोन दिवसात पंढरपुरात 32 लाख वारकरी
Wari: कलेक्टर एस.कार्तिकेयन ठरले वारकऱ्यांसाठी देवदूत, हां खरंच वीर धरण ओरव्हफ्लो झाले अन् श्वास रोखला…
सोलापुरात रेल्वेसमोर उडी मारून मायलेकीची आत्महत्या