सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडला अन झेडपीत सीईओ मनीषा आव्हाळे यांनी साजरा केला आनंदोत्सव
कृषी विभागासाठी नवीन कार्यालय आणि शेतकऱ्यांसाठी केली अवजारांसाठी घोषणा

सोलापूर : पाऊस पडल्याचा आनंद कोणाला होत नाही? मृगाच्या दमदार हजेरीने सोलापूर जिल्हा दुष्काळातून बाहेर येत असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कृषी विभागाचा आनंदोत्सव साजरा केला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला नवीन कार्यालय तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारांसाठी अनुदानाची तरतूद मंजूर केली आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कात टाकली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाला वेगळा साज चढविण्याचा संकल्प केला आहे. मुख्य इमारत मोकळ्या हवेपासून मुक्त होती. यापूर्वी बसविलेल्या काचा काढून त्या ठिकाणी मोठ्या खिडक्या बसविल्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कक्षांमध्ये मोकळे हवा येऊ लागली आहे त्यानंतर आतील पोर्चमधील तुटलेल्या फरशा काढून नवीन फरश्या घालण्याचे काम सुरू आहे. सभागृह व आतील कक्षांचे नूतनीकरण वेगाने सुरू आहे. जुन्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षा जिल्हा परिषदेच्या कृषी कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे हा कक्ष नव्याने सजविण्यात आला आहे. पक्षाचे उद्घाटन मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कृषी अधिकारी परमेश्वर वाघमोडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या नवीन कार्यालयातच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कृषी विभागाची बैठक घेतली. यात जिल्हा परिषद कृषी विभागाकडील योजना, गोबर गॅस संलग्न शौचालय पूरक अनुदान,पीक संरक्षण अवजारे, उपकरणे अंतर्गत थ्री प्रीस्टन पंप, स्प्रे पंप, ब्रश कटर ,सोलार इन्सेक्ट ,कृषी अभियांत्रिकी योजना अंतर्गत ट्रॅक्टरचलित अवजारे रोटावेटर ,पलटी नांगर ,पेरणी यंत्र, पावर टिलर कृषी सिंचन साठी सुधारित अवजारे व साधने पुरवणी अंतर्गत 5 व 7 एचपी विद्युत पंप संच,सुधारित अवजारे साहित्य पुरवठाअंतर्गत कडबा कुट्टी, ताडपत्री ,विविध उप करण अंतर्गत कडधान्य , सेंद्रिय शेती अवजारे उपकरणे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 75 लाख रुपयाचे सेस योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सोलापूर जिल्हा परिषदअंतर्गत कृषी विभागांमध्ये शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या डीबीटी साहित्याच्या व इतर बाबींवरील खर्च प्रशासकीय मान्यता मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सीईओ आव्हाळे यांच्या प्रयत्नातून कृषी विभागाला नवीन कार्यालय व शेतकऱ्यांना अवजारासाठी अनुदान मंजुरी हा दुग्धशर्करा योग एकाच वेळी घडवून आणला. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,स्मिता पाटील , मीनाक्षी वाकडे सचिव म्हणून कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे आदी उपस्थित होते.या बैठकीस जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते .या बैठकीचे संचलन जिल्हा कृषी अधिकारी सामान्य सागर बारावकर यांनी केले तर अनुसूचित जाती उपयोजनाच्या आढावा जिल्हा कृषी अधिकारी विघयो नंदकुमार पाचकुडवे यांनी केले. या बैठकीस सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज ,उमाकांत कोळी, राजश्री काँग्रे,ओम कोकणे मलिकार्जुन स्वामी,अंबिका वाघमोडे आदींनी परिश्रम घेतले.