सोलापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांना दोन कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणात प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांच्यासह दोन पत्रकाराविरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सदर बजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी व युट्युब,, वेब पोर्टलचे पत्रकारांनी 11 जून पासून डॉ. माने यांच्याविरुद्ध बातम्या प्रसारित केल्या. याबाबत त्या खुलासा करण्यास गेल्यावर कुलकर्णी यांनी दोन कोटीची खंडणी मागितली. तसेच ईतर दोघांनी वारंवार बातम्या प्रसारित करून त्रास दिला. तसेच आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांच्या यांनी विरोधात बातम्या देऊन खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध