December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपी पतसंस्थेत सत्ताधारी समर्थ पॅनलचीच हॅट्रिक

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी समर्थ पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी बाजी मारली आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले सायंकाळी मतमोजणी झाली तेव्हा समर्थ पॅनलच्या उमेदवारांना साडेपाचशे तर परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना अडीचशे पर्यंत मते मिळाले आहेत. परिवर्तन पॅनल चा धुवा उडवत समर्थ पॅनलने आपले वर्चस्व कायम राखले आहे.. विद्यमान अध्यक्ष विवेक लिंगराज यांनी आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे.. अद्याप सर्व उमेदवार यांचा निकाल हाती येणे बाकी आहे.