सोलापूर: जिल्हा परिषदेतील चार लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात आप्पासाहेब भोसले यांना ग्रामपंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर पंचायत समिती मधील कर्मचारी नागेश धोत्रे यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती पंढरपुर येथे पदोन्नती देण्यात आली आहे तर
सौ. मनीषा वास्ते यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आणि
सौ. शशिकला म्हेत्रे यांना पंचायत समिती अक्कलकोट येथे पदोन्नतीवर नियुक्त करण्यात आले आहे.मोहोळ पंचायत समितीतील शिक्षण विभागातील आप्पासाहेब भोसले यांचे ग्रामपंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. हा अतिरिक्त पदभार बांधकाम क्रमांक एकचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी झेड.ए. शेख सांभाळत होते. आता त्यांच्या जागी भोसले यांनी पदभार घेतला आहे. कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे यांनी आभार मानले आहेत.

More Stories
सोलापूरच्या महिला बचत गटाचा 30 टन कांदा गेला श्रीलंकेला
सोलापूर विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करून सोलापूरची विमानसेवा जोमाने सुरू ठेवण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही