आनंदाची बातमी: उजनीतून कालव्यात पाणी सोडले
समाधानकारक पाऊस न झालेल्या माढा, मोहोळ दक्षिण ला होणार फायदा

सोलापूर : भीमा पाटबंधारे विभागाने अखेर शेतकऱ्यांसाठी मुख्य कालव्यात 500 कुसेक्स पाणी सोडले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडलेल्या माढा, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
पुणे जिल्ह्यात पावसाची कोसळधार सुरूच आहे. त्यामुळे उजनी धरणात पाण्याचा प्रवाह येतच आहे. धरण 100% भरल्याने भीमा नदी, बोगदा, वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. पण कालव्यात पाणी सोडले नव्हते. पुणे जिल्ह्यात पाऊस असला तरी सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच तालुक्यांमध्ये केवळ पेरणी योग्य पाऊस पडला आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील सिंचनासाठी उजनी धरणातून वाया जाणारे पाणी कालव्यात सोडले तर शेतकऱ्यांना फायदा होईल अशी मागणी होत होती. त्यानुसार भीमा पाटबंधारे विभागाने मुख्य कालव्यात पाणी सोडले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटबंधारे विभागाकडून मंगळवारी सकाळी 9 ची उजनी धरणाची पाण्याबाबत दिलेली माहिती खालील प्रमाणे आहे.
*Ujjani Dam* :-
Daily Gauges —
Date —- 06/08/2024 at 9:00 Hrs
RWL —— 497.185 m
Water Spread Area = 345.20 Sq.km.
*-Storage-*
Gross — 3440.85 MCum.
— ( 121.50 TMC)
Live — 1638.04 MCum.
— (57.84 TMC)
Live % —– *107.97 %*
*Inflow River Gauging Station @ Daund :-*
River Water Level – 502.403 m
Inflow Discharge – 96238 Cusecs.
*Outflows :-*
1) Sina Madha LIS – 105 cusecs.
2) Dahigaon LIS – 100 Cusecs.
3) Tunnel – 900 cusecs.
4) Main Canal – 500 Cusecs.
5) Power – 1600 Cusecs.
6) Spillway – 125000 Cusecs.
*Bhima River Total Discharge – 126600 Cusecs.*
*नीरा खोरे – नदीत सोडलेला विसर्ग*
*दिनांक-6-8-24(10:00 am)*
*भाटघर*. =8631 Cusecs
*नीरा देवघर*=2656 Cusecs
*गुंजवणी* =250 Cusecs
——————————–
*एकुण* = 11537 Cusecs
———————————–
*वीर*- = 5987 Cusecs