सोलापूर : जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर जे यश मिळत जाते त्यावेळेस आपल्या माणसांकडून किंवा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाकडून दिलेल्या कौतुकाचे थाप ही भविष्यातील यशाचे शिखर गाठण्यासाठी ऊर्जा स्तोत्र ठरते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहामध्ये जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक १ च्यावतीने जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे या बोलत होत्या.यावेळी दहावी ,बारावी गुणवंत विद्यार्थी ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह करण्यात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम, पुस्तक, आयुर्वेदिक वनस्पतीचे  रोप, व तिरंगा चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश अधिक उजळून दिसतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांनी न डगमगता आपण निवडलेल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठावे.आपल्या स्वतःची व त्याचबरोबर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून देशसेवा करावी असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.यावेळी प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांनी जे यश मिळवले त्या यशामध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचे आहे आणि निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.

तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांनी स्पर्धा परीक्षेकडे जात असताना कष्ट, ,चिकाटी आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे उपस्थित होते.याप्रसंगी दहावीतील ३० व बारावीच्या १२ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी विद्यार्थ्यांमधून प्रांजली मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक चेअरमन विवेक लिंगराज,सूत्रसंचालन डॉ.एस. पी माने,यांनी तर आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर यांनी केले.

याप्रसंगी माजी संचालक श्रीशैल देशमुख,दत्तात्रय घोडके, दीपक घाडगे, सुंदर नागटिळक,शेखर जाधव,हरिबा सपताळे, त्रिमूर्ती राऊत, धन्यकुमार राठोड, अनिल जगताप,  सुनंदा यादगीर, नूतन संचालक विष्णू पाटील,शहाजान तांबोळी, सुरेश कुंभार, श्रीधर कलशेट्टी, विशाल घोगरे, तजमुल मुतवली,गजानन मारडकर, शिवानंद म्हमाने,किरण लालबोंद्रे, विकास शिंदे, चेतन वाघमारे,शिवाजी राठोड,विजयसिंह घेरडे ,मृणालिनी शिंदे, श्वेतांबरी राऊत आदी उपस्थित होते.सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे, अशोक पवार, सुभाष काळे,विनोद कदम,जगदेवी अंजनलकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *