सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले, त्यांची पत्नी, दोन मुलांविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर अँटी करप्शनच्या पथकाने चौकशी करून ही कारवाई केली आहे.
याबाबत अँटी करप्शनचे उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले यांनी त्यांची पत्नी संगीता मुलगा स्वप्निल व सागर यांच्या नावे 9 कोटी 69 लाखाची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1997 ते मार्च 2022 या कालावधीत लोकसेवक असताना डिसले यांनी ही संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. पुढील तपास सुरु आहे.