सोलापूर : पुणे बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांना मंगळवार दि. 10 फेब्रुवारी रोजीपासून सही वातावरणात सुरुवात झाली. इंग्रजीचा पहिलाच पेपर असल्यामुळे परीक्षार्थी पेक्षा पालकांच्यावरच जास्त दडपण असल्याचे दिसून आले. आपल्या पाल्याला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. परीक्षा केंद्रावर तणाव मुक्त वातावरण राहण्यासाठी ठीक ठिकाणी परीक्षारथींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च चा आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर. जिल्ह्यामध्ये 120 परीक्षा केंद्रांमध्ये 56 हजार 297 पैकी 56 हजर 8 विद्यार्थी उपस्थित होते. एकूण 209 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार आढळून आलेला नाही. सर्व परीक्षा केंद्रावर सी.सी.टीव्ही कार्यान्वित असल्यामुळे कॉपीमुक्त अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हास्तरीय दक्षता समितीचे सचिव तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले असले तरही भरारी पथकांनीही वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात होते. त्याचबरोबर संवेदनशील परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाहेरून कॉपी पुरवठा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मोठी दक्षता घेतल्याचे दिसून आले. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी गतवर्षी जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान यशस्वी करण्यासाठी परीक्षकाच्या मोबाईल वरून पक्षाचे ऑनलाइन लाईव्ह केले होते. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सर्वच परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परीक्षा काळात या कॅमेरा द्वारे लाईव्ह चित्रण जिल्हा परिषद कार्यवानिमित्त करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात आल्यामुळे सर्वच परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे सुरू झाले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाच्या कॉपीमक्त अभियानाचे पालकांमधून स्वागत होत आहे.

More Stories
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूत पोटासाठी आझाद मैदानावर
“या’ दिवशी होणार सोलापूर झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षची निवड
असे आहेत सोलापूर झेडपीचे नवे कारभारी