सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार, सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी रविवारी जुळे सोलापुरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी मतदारांनी पुष्पहार घालून काडादी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले तर सुवासिनींनी औक्षण करुन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्पदेखील यावेळी करण्यात आला.
जुना विजापूरनाका येथून ढोल-ताशाच्या निनादात ही भव्य पदयात्रा निघाली. श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज की जय, श्री सिध्देश्वर परिवाराचा विजय असो, निवडून, निवडून येणार कोण, काडादी यांच्याशिवाय दुसरे कोण, हवा कुणाची, काडादी यांची, धर्मराज काडादी तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, काडादी यांचा विजय असो, अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी मतदारांनी दिल्या. धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले टी-शर्ट घातलेले टोपी, उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलकदेखील होते. पदयात्रा मार्गस्थ होताना धर्मराज काडादी यांचे ठिकठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करुन मतदारांनी त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. जुळे सोलापूर परिसरातील विविध नगरांमध्ये सुवासिनींनी औक्षण केले. ठिकठिकाणी मतदार व कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत जंगी स्वागत केले. या मतदारांना काडादी यांनी मतदारांना हात उंचावून अभिवादन केले. त्यांच्या आवाहनाला मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांनी अनेक नगरांतील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना काडादी यांचे माहितीपत्रक देऊन कॉम्प्युटर या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
पदयात्रा जुना विजापूरनाका येथून सुरु होऊन माजी सैनिकनगर, विजापूरनाका पोलीस ठाणे, वीरशैवनगर, विशालनगर, दावत चौक, कोणार्कनगर, न्यू संतोषनगर, जगदीशश्री लॉन्स, शांती निकेतन शाळा, जुने संतोषनगर, प्रेमनगर, जामगुंडी लॉन्स, वामननगर, डी-मार्ट, पाण्याची टाकी, बालाजी मंगल कार्यालय, कुबेर लक्ष्मी मंगल कार्यालय, जुनी आयएमएस शाळा, फ्लोरा गॅलेक्सी, अक्षय सोसायटी, ब्रह्मा गॅलेक्सी, मारुती मंगल कार्यालय, कुसुमराज मल्टिपर्पज हॉल, अलकनंदा जोशी जुनिअर कॉलेज, दत्तनगर, कुमठेकर हॉस्पिटल परिसर, म्हाडा कॉलनीमार्गे गोंविदश्री मंगल कार्यालयाजवळ विसर्जित झाली.
या पदयात्रेत श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सिकंदरताज पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार, श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, राजशेखर पाटील, शिवानंद पाटील-कुडल, विद्यासागर मुलगे, बाळासाहेब पाटील, शरणराज काडादी, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुस्लीम समाजाकडून स्वागत
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या जुळे सोलापुरातील पदयात्रेदरम्यान त्यांचे विविध समाज बांधवांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुस्लीम समाज बांधवांनीही काडादी यांचे स्वागत करुन त्यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
औक्षण आणि संकल्प
जुळे सोलापूर परिसरातील वेगवेगळ्या नगरांमधून पदयात्रा मार्गस्थ होत असताना धर्मराज काडादी यांचे ठिकठिकाणी सुवासिनींनी पंचारतीने ओवाळून औक्षण केले आणि विजयासाठी काडादी यांना शुभेच्छा दिल्या. 20 नोव्हेंबर रोजी कॉम्प्युटर चिन्ह असलेले बटन दाबून काडादी यांना प्रचंड मतांनी विजयी करु, असा संकल्प माताभगिनींनी केला.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे समर्थन
आसरा चौक येथील वृत्तपत्र विक्री केंद्रावर काडादी यांनी सोमवारी पहाटे सदिच्छा भेट दिली. त्यानंतर वृत्तपत्र विक्रेत्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान काडादी यांनी सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना आपल्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन केले. यावेळी सोलापूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेचे व आसरा सेंटरचे अध्यक्ष शिवलिंग मेढेगार यांनी धर्मराज काडादी यांना निवडून आणण्यासाठी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व वृत्तपत्र विक्रेते जिवाचे रान करतील असे सांगून त्यांच्या पाठीशी सर्व वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबीय खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.तसेच काडादी यांना निवडून येण्यासाठी सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे ज्येष्ठ विक्रेते अरविंद नंदर्गी, आदिनाथ जगताप, राचप्पा आळंगे,भीमाशंकर ढमामे, अंबादास शिंदे, अशोक खरात, मोहन कबाडे, अनिल जाधव,रेवण पुजारी,नागनाथ मादगुंडी तसेच परमेश्वर कोळी, अंकुश दोडके, उमेश सातपुते, विजय पतंगे, गौरीशंकर ढमामे, संतोष येलगट्टी, अविनाश हंचाटे ,बाळू टेंभुर्णीकर, लक्ष्मीकांत कटाप, शशिकांत पाठक, सुरेश धुळे, संजू मठपती,सत्यवान व्यवहारे यांच्यासह वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी,सदस्य व वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन काशीनाथ भतगुणकी यांनी केले.