सोलापूर : वडार समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांसाठी राबविण्यात आलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेमुळे समाज बांधवांचा फायदा झाल्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी सदैव राहणार असल्याची भावना वडार समाजाच्या मेळाव्यात समाजाचे पदाधिकारी आणि पंच कमिटी, महिला, युवक वर्गांनी संकल्प केला.
२४८, विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी सायंकाळी रविवारपेठ येथे वडार समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवानंद पाटील, विनायक विटकर, वडार समाज जिल्हाध्यक्ष गौतम भांडेकर, श्रीपाद घोडके, माजी नगरसेविका विजया घोडके, प्रतिभा मुदगल, बापू ढगे, रवी शिंदे, पंच कमिटीचे शंकर मंजेली, छबू साळुंखे, सिद्धू मंजुळे, लक्ष्मण मंजेलि, राजू पात्रुडट, कुणाची भांडेकर, विकास विटकर, हनुमंतू साळुंखे, बंडू कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
शारीरिक परिश्रम करणारा कष्टकरी समाज म्हणून वडार समाज ओळखला जातो. आपल्या समाजातील कामगार मंडळी लोकांची घरे बांधतात, स्वतः मात्र साधेपणात राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून देशातील शेवटचा माणूस जोपर्यंत प्रगती करत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ आपण घ्यावे. दहिटणे येथे घरकुल योजनेतून एक लाख 71 हजार रुपयांमध्ये 300 स्क्वेअर फुटाचे पक्के बांधकाम असलेलं घर देण्यात येत आहे. त्यासोबतच बांधकाम कामगार कार्ड असेल तर केंद्र आणि राज्याच्या 34 प्रकारच्या वेगवेगळ्या योजनेचा फायदा या कार्डधारकांना होत असतो. याचाही फायदा आपण घ्यावा.उज्वला गॅस योजना, आयुष्यमान आरोग्य योजना, अन्नसुरक्षा योजना, यासारख्या अनेक योजनांचा लाभ केंद्र आणि राज्य सरकार देत आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजनेमुळे अनेक माता भगिनींना कुटुंबासाठी आर्थिक मदत होत आहे. वडार समाजाच्या समाजाच्या प्रत्येक माता भगिनी आणि बंधूंसाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे मनोगत आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केले.
भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती सरकारने वडार समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून समाजातील अनेक होतकरू तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहायता मिळेल. यासाठी आम्ही शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी यावेळी सांगितले.यावेळी भुलाभाई चौक पंच कमिटी, बाळवेस पंच कमिटी,रविवार पेठ पंच कमिटी,घरकुल पंच कमिटी, गांधीनगर पंच कमिटी,बाळे पंच कमिटीचे पदाधिकारी महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.