सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा श्री सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या प्रचारार्थ भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जुळे सोलापूर परिसरात दुसऱ्यांदा जोरदार पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला, रस्त्याच्या दुतर्फा थांबून मतदारांनी या पदयात्रेचे जोरात स्वागत केले.
रविवारी सैफुल येथील ओम गर्जना चौकातील पावन गणपती मंदिरात श्रींचे दर्शन घेऊन निघालेल्या या पदयात्रेत श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष हरीश पाटील, दक्षिणचे माजी सभापती भीमाशंकर जमादार, अशोक देवकते, माजी नगरसेवक प्रा. भोजराज पवार, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, अॅड. शिवशंकर बिराजदार, अरूण लातुरे, महादेव जम्मा, शिवानंद बगले-पाटील, विद्यासागर मुलगे, सुरेश झळकी, सिध्दाराम व्हनमाने, बाळासाहेब पाटील, समीर सलगर, सुदर्शन हसापुरे, काँग्रेसचे हेमंत जाधव, निशा मरोड, दिलीप सिद्रामप्पा पाटील, सैपन शेख, संपन्न दिवाकर, विशाल सावंत, प्रकाश परमशेट्टी, लक्ष्मण झळकी, सुरेश वाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पावन गणपती मंदिराचे पदाधिकारी धुंडप्पा हडपद, सिद्धप्पा ब्रह्माणवरु, भीमा जमादार, भगवान हुलजंती, कोंडिबा अत्तार यांच्यासह ओम गर्जना चौक येथील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
ही पदयात्रा पुढे विजापूर रोडमार्गे आयटीआयजवळील रस्त्यावरुन भारती विद्यापीठमार्गे गोविंदश्री मंगलकार्यालय येथील काडादी यांच्या संपर्क कार्यालयाजवळ गेल्यानंतर या पदयात्रेची सांगता करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल-ताशांच्या निनादात ही भव्य पदयात्रा निघाली. श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज की जय, श्री सिध्देश्वर परिवाराचा विजय असो, निवडून निवडून येणार कोण, काडादी यांच्याशिवाय दुसरा कोण, हवा कुणाची काडादी यांची,धर्मराज काडादी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, काडादी यांचा विजय असो, अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी नागरिकांनी दिल्या. धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले टी-शर्ट घातलेले, टोपी, उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलकदेखील होते. कार्यकर्त्यांनी परिसरातील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना काडादी यांचे माहितीपत्रक देऊन कॉम्प्युटर या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या पदयात्रेदरम्यान काडादी यांचे महिलावर्गांनी औक्षण करुन त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नागरिकांनीही काडादी यांचे पुष्पहार घालून ठिकठिकाणी स्वागत करत त्यांना निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या उमेदवाराकडून सातत्याने होणार्या अन्यायातून सुटका होण्यासाठी काडादी यांचा विजय आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागरिकांनी केले. सोलापूरच्या हद्दवाढ भागाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प मतदारांनी यावेळी व्यक्त केला.
मुस्लीम बांधवांनीही केले स्वागत
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या पदयात्रेवेळी सैफुल, विजापूर रोड, जुळे सोलापूर भागातील अनेक मुस्लीम बांधवांनी काडादी यांचे जोरदार स्वागत करत त्यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.