सोलापूर : जिल्हा परिषेदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांची मंत्रालयात विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीईओ कुलदीप जंगम हे होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, शिल्पा शेळकंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरूण तोडकर, मंगळवेढाचे गटविकास अधिकारी कदम , अक्कलकोटचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन डाॅ. माने, कर्मचारी युनियनचे राजेश देशपांडे, मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरूण क्षिरसागर, विस्तार अधिकारी संघटनेचे ज्ञानेश्वर सुतार, ग्रामसेवक संघटनेचे शरद भुजबळ, अधिक्षक झेड. ए. शेख, लेखा विभागाचे हुच्चे उपस्थित होते.
ग्रामपंचायत व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने तुळशी हार व स्मृतीचिन्ह देऊन सिईओ कुलदीप जंगम यांच्याहस्ते शळकंदे यांचा गौरव करण्यात आला.
शेळकंदे यांच्या चिकाटीचे कौतुक
माझी वसुंधरा अभियान,विस्तार अधिकारी पदोन्नोती असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी उप मुख्य कार्यकारी इशाधिन शेळकंदे यांनी परिश्रम घेतले, असे मत सिईओ कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले. शेळकंदे यांच्याकडून खुप शिकण्यासारखे होते. त्यांच्याकडे असलेली कामाविषयी निष्ठा सातत्य, जिद्द, चिकाटी वाखाणण्यासारखी आहे, असेही सिईओ जंगम यांनी सांगितले.
सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मी समाधानी
सोलापूर जिल्ह्यात ७ वर्षे सेवा करण्याची ची संधी मिळाली. काम करताना कामाचा शेवटचा दिवस म्हणून काम केले. माझी वसुंधरा अभियाना राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. तत्कालीन सिईओ दिलीप स्वामी यांच्यामुळे प्रेरणा मिळाली. तत्कालीन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली अॅम्बुलन्स व ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व्हॅन घेता आली. सिईओ जंगम यांनी काम करण्याची संधी दिली तर अतिरिक्त सिईओ कोहिणकर यांच्यासमव्त सलग तीन आषाढी यात्रा पार पाडता आल्या. वारकरी सेवेचा आनंद घेता आला. अशा आठवणी सांगताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे हे काही क्षण भावुक झाले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, शिल्पा शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. विविध संघटनेचेवतीनेही शेळकंदे यांचा सत्कार करण्यात आला.

More Stories
सोलापूरची ६० वर्षांची प्रतीक्षा संपली; सोलापूरकरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भेट
जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर
सोलापूर झेडपीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलल्या