सोलापूर: स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025 सोलापूर महानगरपालिका निवडणुकीकरिता निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी आमदार कल्याणशेट्टी यांना या नव्या जबाबदारीचे पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी आपण आपल्या संघटन कौशल्याने भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडूण येण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे असे नमूद केले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत भाजपचे तीन आमदार आहेत. यामध्ये शहर उत्तर मध्ये आमदार विजयकुमार देशमुख दक्षिण मध्ये आमदार सुभाष देशमुख तर शहर मध्य मध्ये देवेंद्र कोठे आहे. असे असतानाही भाजप प्रदेशने आमदार कल्याण शेट्टी यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. आमदार कल्याण शेट्टी यांनी यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच नुकताच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी जबाबदारी पार पडली आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत कोणताही धोका होऊ नये याची भाजपच्या वरिष्ठ स्तरावरूनच काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

More Stories
अक्कलकोट: शाळेवर शिक्षणाधिकारी, विद्यार्थी हजर पण शिक्षकच गायब
सोलापूर झेडपीची विमा सुरक्षा कवच योजना राज्यभर राबविणार
सोलापुरात विड्या वळत महिलांनी ऐकली “मन की बात’