सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक मंगळवारी दुपारी चार वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यात भाजपला धक्का देणारी घटना घडली आहे. भाजपच्या नेत्याने रष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी शेटफळ दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा भाजपचे नेते विजयराज डोंगरे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. ऐन झेडपी निवडणूक जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा मोठा धक्का आहे. मोहोळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या जागा यशस्वी करण्याचा निर्धार केला असल्याचे आमदार राजू खरे यांनी सांगितले. यामध्ये चार जागा विजयराज डोंगरे गटाला राष्ट्रवादीतर्फे देण्याचा निर्णय झाला आहे. यात बहुचर्चित कुरुल जागेचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. पेनुर ची जागा चौरे यांना मिळणार आहे तर कुरुलची जागा स्थानिक नेते जगताप यांना मिळेल असे सांगितले जात आहे. भाजपने नरखेडची जागा जाहीर केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी –भाजप युती अशक्य असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार फोडले आता जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने आपला करिष्मा दाखवण्यास सुरुवात केली आहे.

More Stories
शिवजयंतीनिमित्त निघणार 5000 विद्यार्थ्यांची रॅली
बापरे… सीसीटीव्हीत दिसली कॉपी; मोरोचीच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
झेडपीत या सभापती पदासाठी परिचारक गटाचे “हे’ नाव चर्चेत