सोलापूर : लोकशासन आंदोलन पार्टीतर्फे दक्षिण तहसील कार्यालयासमोर दरवर्षीप्रमाणे मुद्रांक विक्रेते जिथे बसतात तिथे सोलापूर जिल्ह्याचे उपनिबंधक किरण गायकवाड यांच्याहस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले,
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ दिंडोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मारुती जाधव, तसेच तानाजीं शिवशरण, नागनाथ कदम श्रीकांत माने, अभिषेक खांडेकर व विविध पदाधिकारी हजर होते. तसेच जिल्हा परिषद सोलापूर येथे दरवर्षीप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ महिला महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष शुभांगी जाधव यांच्यावतीने पाणपोई सुरू करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्याहस्ते या पानपोईचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विस्तार अधिकारी सचिन कदम, माने, शरणप्पा बिराजदार हे उपस्थित होते. जिल्हा परिषदेत कामानिमित्त आलेल्या अनेकांची यामुळे सोय झाली आहे.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध