सोलापूर : एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दिलासा योजनेतून आर्थिक मदत करण्याचा निर्णय दक्षिण सोलापूर पंचायत समितीने घेतला आहे. सभापती संदीप टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली असा निर्णय घेणारी दक्षिण सोलापूर पंचायत समिती राज्यात पहिली ठरली आहे.
दक्षिण सोलापूर पंचायत समितीची पहिली गासिक समा दि. १ एप्रिल रोजी पंचायत समिती सभागृह येथे नवनिर्वाचित सभापती संदिप अमृत टेळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला उपसभापती वर्षा पटणे, सदस्य विजय राठोड, सुरज पाटील, बलवान गोतसुर्वे, अंबिका पाटोल, पंचप्पा धनशेटटी, मळसिध्द मुगळे. प्रियांका आसचे, प्रियांका कुबसंगे, अंबिका दुपारगुडे व सचिव तथा गट विकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते.
सभेत पुढील महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दिलासा योजना- दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील होतकरू विदयार्थी यांच्या उज्वल भविष्यासाठी (UPSC MPSC) स्पधर्धा परिक्षाची तयारी करण्यासाठी पुस्तके, शिकवणी घेणेकामी १५ वित्त आयोग पंनायत समितीस्तर व पंचायत समिती सेसअंतर्गत चालू आर्थिक वर्षात MPSC पूर्व परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विदयार्थ्यांसाठी रक्कम रुपये ५००० रु . व UPSC पूर्व परिक्षा उत्तीणं होणाऱ्या विदयार्थ्यासाठी रक्कम रुपये १०००० रु .प्रोत्साहनपर अर्थ सहाय्य देणे बाबतचा विषय सभागृहात पं स सदस्य बलवान गोतमुर्वे यांनी मांडला असता त्यास सर्व सदस्य यांनी सर्वानुमते ठराव पारित करुन दिलासा योजनेतून विदयार्थ्यांना प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य देणे बाबत ठरावास मंजुरी दिली.
CSR Fund बाबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील Industrial Area अंतर्गत प्राप्त होणारा CSR Fund ग्रामपंचायत स्तरावर जमा करणे ऐवजी सदरचा CSR Fund हा पंचायत समितीस्तरावर एकत्र जमा करुन त्याचा वापर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे करणे सोईस्कर होईल बाबत सभापती संदिप देळे यांनी विषय मांडला असता त्यास सर्व सदस्य यांनी सर्वानुमते ठराव पारित करुन CSR Fund पंचायत समिती स्तरावर एकत्र जमा करणेबाबत मंजुरी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान (उमेद) अंतर्गत प्रभाग संघ व ग्राम संघास कार्यालय उपलब्ध करुन देणे- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जोवनज्योती अभियान (उमेद) अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यरत प्रभाग संघ व ग्राम संघास ग्रामपंचायत स्तरावर कागकान करणेस कार्यालय उपलब्ध करुन देणे बाबतचा विषय सभागृहात सदस्य अंबिका पाटील यांनी मांडला असता त्यास सर्व सदस्य यांनी सर्वानुमते ठराव पारित करुन प्रभाग संघ व ग्राम संघास ग्रामपंचायतस्तरवर कामकाज करणेसाठी कार्यालय उपलब्ध करुन देणेबाबत ठरावास मंजुरी दिली असल्याची माहिती सभेचे सचिव तथा गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.

More Stories
एस कार्तिकेन सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी
योजना शिक्षण अधिकारी सुलभा वठारे यांचा वट्ट वाढला; शासनाने अनुकंपा भरतीचे दिले अधिकार
अंकुश चव्हाण यांना लष्कराकडून ‘दक्षिणी कमान सरसेनापती पदक’