सोलापूर : शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे आता शाळकरी मुले इकडे तिकडे भटकताना दिसतील. मुलांना पोहण्याचा मोह आवरत नसल्यामुळे जिल्ह्यातील खाणी, शेततळे, भरलेल्या विहिरी याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसील कार्यालयांना दिल्या आहेत.
मुलांना सुट्ट्या लागल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर्षी पहिल्यांदाच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १६३ (पुर्वीचे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४) च्या तरतुदी लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हयात बंद पडलेल्या दगड खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठून धोकादायक पाणीसाठा झालेचे ब-याच ठिकाणी बाब समोर आलेली आहे. अशा ठिकाणी नागरीक तसेच छोटी मुले कपडे धुण्यासाठी, पोहण्यासाठी जातात. अशात पोहता येत नसल्याने दुर्घटना घडून लहान मुलांचा बुडून मृत्यु झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
सध्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परिक्षा संपत आहेत. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर मुले पोहायला जातात. अशा धोकादायक ठिकाणी कोणी जाणार नाही याकरीता धोक्याच्या सुचनांचा फलक दर्शनी भागात लावावा. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या पावसाच्या पाण्याचा साठा झालेल्या दगड खाणी, निर्जन नदी किनारा, तलाव, कालवा, मोठी डबकी अशा ठिकाणांचा शोध घेऊन उक्त प्रमाणे अनुचित दुर्घटना घडू नये याकरीता त्या परिसरामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करणेकामी उचित आदेश आपले स्तरावरुन निर्गमित करणेत यावेत, असे सर्व तहसीलदारांना अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी कळविले आहे .

More Stories
सोलापूर जिल्हा परिषदेच्या तीन फ्लॅटचा शोध लागला पण पुढे काय?
दहावी, बारावीला असलेल्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या…
शेवग्याच्या पानाचे थालीपीठ, नाचणीची उसळ; अंगणवाडी सेविकांनी बनविल्या 100 पाककृती