पंढरपूर: आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी व महापूजेसाठी पंढरपूर येथे आगमन झालेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली आणि समाजसेवेच्या कार्यात अधिक जोमाने कार्य करण्याची नवी उर्मी व नवचैतन्य मिळाले अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी व्यक्त केली. त्यांच्या समवेत विनायक सुतार हे उपस्थित होते.एका सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याची संधी मिळणे ही अविस्मरणीय पर्वणीच होती अशी प्रतिक्रिया विनायक सुतार यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार राजा राऊत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध