July 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून कुंभारी विडीघरकुल येथील दोन घरफोड्या उघड

सोलापूर: सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुंभारी विडीघरकुल येथील दोन घरफोड्या उघड केल्या आहेत. अटक केलेल्या चोरट्याकडून 10 ग्रॅम सोन्याचे व 110 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मालाविषयी गुन्हयाची उकल करणेकामी मोहोळ पोलीस ठाणे येथील शिवाजी चौकातील ब्रिजखाली हजर असताना पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद शिंपाळे व योगेश जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ढोकबाभूळगांव येथील रेकॉर्डवरील आरोपीने विडीघरकुल येथे घरफोडी  केली असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संजय जगताप यांना कळविले. त्यावर जगताप यांनी सपोनि ज्ञानदेव वाघ यांना कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे ढोकबाभूळगांव येथे पथक गेले असता, तेथे बातमीप्रमाणे एक इसम उभा असलेला दिसला. सपोनि वाघ यांना संशय आल्याने, त्यास ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. खाक्या दाखविताच त्याने आपले नाव बंडू उर्फ बंदेनवाज मधूकर पवार असल्याचे सांगितले. तपास केल्यावर त्याने 3 महिन्याखाली साथिदार उमेश प्रकाश काळे (रा.मलिकपेठ ) याचेसोबत विडीघरकुल येथे रात्रीच्या वेळी दोन ग्रफो 7केल्याची कबुली दिली.असल्याबबात सांगितले. या घरफोड्यांची वळसंग पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे दिसून आले. हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर मालमत्ता चोरीचे 35 गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ शशिकांत कोळेकर, नागेश कोणदे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, प्रमोद शिंपाळे, अक्षय डोंगरे, योगेश जाधव, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, सतिष बुरकुल, महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांच्या पथकाने बजावली आहे.