सोलापूर : जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शनर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून अरुण क्षीरसागर व बाळासाहेब नकाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून एडवोकेट राजेश देशपांडे यांंची बिनविरोध निवड करण्यात आली.
या सभेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या पेन्शनर्स यांना येत असलेल्या अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा होऊन पेन्शनर्स यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खालील पदाधिकारी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष: राजेश देशपांडे, कार्याध्यक्ष: बाळासाहेब देशमुख, उपाध्यक्ष: श्रीमंती एम. ए. लोंढे,दिगंबर भगरे, महिला उपाध्यक्ष: श्रीमती नूतन पिसे, अलका पुराणिक, सरचिटणीस: संदीपान चाबुकस्वार, सह चिटणीस: नागनाथ धोत्रे, खजिनदार: अविनाश भोसले, मुख्य संघटक: एन. पी. चव्हाण, संघटक: दत्ता वाघमारे, राजेंद्र सोनकांबळे, सुधीर मस्के, महादेव काळे, अशोक रंगदाळ इमाम मुलानी, कार्यकारिणी सदस्य: सुनंदा सुरवसे, अनिल हिरशेट्टी, मधुकर क्षीरसागर, अनंत माने, बाळासाहेब नकाते,नागनाथ सुरवसे, जमनाबाई रजपूत, संगीता पाटील, विठ्ठल राठोड, सिराज शेख, शोभा काळे ,राजेश जमादार. महिला प्रतिनिधी: भारती धुमाळ, कांता करंजकर, सीता सकट, मंगला पवार, जयश्री दिवाण, कमल क्षत्रीय, निर्मला मोरे, सल्लागार : अरूण क्षीरसागर, सुहास चेलेकर, विजय राऊत, प्रकाश माने, हणमंत निकम, शंकर खूळपे, राजीव गाडेकर, खलील शेख, सुनील कुलकर्णी, चंद्रकांत होळकर, बसवंत गुरव. याप्रसंगी सुरेश मुद्दगल, नवनाथ सलवदे, शोभा कुलकर्णी, शीला सोमवंशी, नागरसे,तानाजी काळे, मंगरूले, गोविंद पाटील, सिंधुताई म्हेत्रे उपस्थित होते. कार्यक्रमात एन पी चव्हाण, सुनंदा सुरवसे, नूतन पिसे, बाळासाहेब नकाते, प्रकाश माने, अलका पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब नकाते आणि सुनंदा सुरवसे यानी केले तर आभार प्रदर्शन अविनाश भोसले यांनी केले.

More Stories
अकलूज येथे नेत्रदीपक रिंगण सोहळा; हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले
सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथावर पुष्पवृष्टी
पावसात भिजणाऱ्या वारकऱ्यालाही पालकमंत्री गोरे यांच्याकडून रेनकोट