सोलापूर: जिल्हा परिषद सोलापूरमधील आरोग्य सेवक (पुरुष) पदावरील सुधारीत सेवा प्रवेश नियमानुसार पात्र गट-ड कर्मचाऱ्यांना पदोन्नती न दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटने ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
संघटनेचे राज्याध्यक्ष रामचंद्र संकपाळ यांनी 31 ऑगस्ट रोजी दिलेल्या च्या निवेदनात आरोप केला आहे की, ग्रामविकास विभागाने 17 डिसेंबर 2025 रोजी आरोग्य सेवक पदासाठी सुधारीत नियम प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेतील गट-ड म्हणजेच परिचर पदावर 3 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक पदावर 75% पदोन्नती देणे बंधनकारक आहे. मात्र, नियम प्रसिद्ध होऊन 8 महिने उलटूनही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्याप पदोन्नती प्रक्रिया राबवलेली नाही. त्यामुळे अनेक पात्र कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत.
संघटने यापूर्वी 24 एप्रिल रोजी देखील यासंदर्भात निवेदन दिले होते. तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर संघटनेने पालकमंत्री गोरे यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. निवेदनात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांना तातडीने सूचना देऊन पदोन्नतीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी आपल्या मागणीवर चर्चा केली. गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत यावर लक्ष वेधले जाईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
मागणी काय आहे?
1. सुधारीत नियम 17/12/2025 नुसार 25:75 प्रमाणे पदोन्नती लागू करणे
2. 3 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या परिचर कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक पदावर पदोन्नती देणे
3. सीईओंना याबाबत तातडीने आदेश देणे
या पदोन्नतीमुळे जिल्हा परिषदेतील परिचर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

More Stories
SIR अंतर्गत तपासणीत जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या 17 ने वाढली
भ्रमणध्वनी बंद करून अडाकूल गायब; झेडपी आरोग्य विभागाची वाढली परेशानी
सोलापूर झेडपी शिक्षकांचा होणार गौरव; पुरस्कार देण्याची तयारी