सोलापूर : सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागातील आवक जावक  रजिस्टर गायब प्रकरणी पाच शिक्षणाधिकारी व तीन लिपिकांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध नेमका काय आरोप व नेमकी कोणती कलमं लावली आहेत हे जाणून घेऊया पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीवरून.

कुठे दाखल झाला गुन्हा: सदर बझार पोलीस ठाणे

गुन्हा रजिस्टर नंबर व कलम : ६७४ / २०२३ महाराष्ट्र सर्वजनिक अभिलेख २००५ चे कलम ८८९ प्रमाणे

गु. घ. ता. वेळ / ठि. दि २४/०४/२०२३ रोजी चे पुर्वी शिक्षण विभाग(माध्यमिक) जिल्हा परीषद, सोलापूर

गु.दा.ता.वेळ: दि ११/१०/२०२३ रोजी २१.५२ वा.

फिर्यादीचे नाव : महारुद्र बाजीराव नाळे, वय ४५ वर्षे, व्यवसाय नोकरी, उप शिक्षणाधिकारी, जिल्हा परीषद) रा. मु.पो. मोरवड, ता. करमाळा, जि. सोलापूर

आरोपीचे नाव: १) भास्करराव बाबर, २) सुलभा  वटारे, ३) जावेद शेख, ४) विदया शिंदे, ५) जे.एस. शिवशरण हे कार्यरत होते त्यांचे कालावधीत अथवा तद्नंतर कार्यभार संभाळणारे प्रमुख लिपीक ६) देवकर, ७) सोनकांबळे. ८) शिरवळ

हकिकत:

यात हकिकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी यातील भास्करराव बाबर, २) सुलभा वठारे 3) जावेद शेख, ४)  शिंदे, ५) जे.एस. शिवशरण हे कार्यरत होते. त्यांचे कालावधीत अथवा तद्नंतर कार्यभार संभाळणारे प्रमुख लिपीक ६) देवकर, ७) सोनकांबळे ८) शिरवळ यांनी त्यांचे कालवधीत पदभार घेते वेळी व देते वेळी शासकीय अभिलेख (रजिस्टर) हे जतन करून ठेवून त्यानुसार कार्यभार सांभाळणे त्यांचे नैतिक कर्तव्य व जबाबदारी असताना देखील त्यांनी जाणीव पूर्वक अथवा निष्काळजीपणा करून सदर अभिलेख नाश केला अथवा गहाळ केली अथवा हरविले असल्याने फिर्यादीची वरील ०१ ते ०८ यांचेविरुद्ध सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे. तपास पोसई लोंढे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *