सोलापूर : येथून जवळच असलेल्या मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीतील एका फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी छापा मारून 16 कोटीचे ड्रग्स जप्त केले तर शंभर कोटीचा कच्चामाल असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सोमवारी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अचानक छापा मारून चोरून ङ्रग्स बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करत कारखाना सील केला.यामध्ये १६ कोटींचे तब्बल ८ किलो ङ्रग्स मुंबईच्या गुन्हे शाखेने हस्तगत केले.मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात ङ्रग्स सापङल्याने सोलापूरात खळबळ माजली आहे.अद्याप हा कारखाना कुणाचा याबाबत पोलिसांकडून माहिती सांगण्यात आली नाही यापूर्वी चिंचोली एमआयडीसी परिसरात अशी कारवाई झाली होती. यामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चे नाव आले होते. सोलापुरात एवढा मोठा ङ्रग्स साठा आलाच कसा? अशी चर्चा रंगली आहे ज्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली तो कारखाना बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत दिसत आहे पोलिसांनी या कारखान्याचे प्रवेशद्वार सील केल्या असून त्यावर डकिवलेल्या कागदावर कारवाईची माहिती देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी इतकी मोठी कारवाई केली तरी शहर व ग्रामीण पोलिसांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात आले.