- सोलापूर : बार्शी तालुक्यातील तांदुळवाडीत सोयाबीनची मळणी करताना डोक्याला बांधलेला स्कार्प मळणी यंत्रात अडकल्याने डोके अडकून महिला जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
नंदा भास्कर गरड (वय ६१, रा. तांदळवाडी, ता. बार्शी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत भानुदास गरड यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी भास्कर गरड यांच्या शेतात सोयाबीनच्या मळणीसाठी यंत्र आले होते. त्यासाठी नंदा गरड व त्यांचा मुलगा रामराजे असे तिघेजण स्वतःच्या शेतात गेले. सोयाबीनची मळणी करण्यासाठी यंत्र चालू केले. यंत्र चालू असताना नंदा या त्या मळणी यंत्राच्याखाली पडलेले सोयाबीन पिकांचे दाणे गोळा करीत होत्या. अचानक डोक्यावर बांधलेला स्कार्प व डोक्याचे केस हे ट्रॅक्टर व मळणी यंत्र जोडलेल्या फिरत्या रॉडमध्ये अडकले. त्यानंतर तिचे डोकेही फिरत्या रॉडमध्ये ओढले गेले. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने जागीच मृत्यू झाला. पांगरी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे व फौजदार नंदकुमार काशीद यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार शब्बीर शेख करीत आहेत.

More Stories
झेडपी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीचा आज मोर्चा
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी