सोलापूर: माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी मोहोळ तालुक्यातील अनगर येथे मातोश्री निवासस्थानी माजी आमदार राजन पाटील यांची दीड तास भेट घेऊन चर्चा केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मोहोळचे माजी आमदार पाटील परिवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे शिंदे परिवाराचा गेल्या अनेक दशकापासूनचा आपुलकीचा स्नेह आजही कायम आहे. या अनुषंगाने शुक्रवारी माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी अनगरला भेट दिली.यावेळी शिंदे यांनी अत्यंत आपुलकीने मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती आणि विकासात्मक वाटचालीची माहिती माजी आमदार राजन पाटील यांच्याकडून घेतली.पाटील परिवाराच्यावतीने लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील आणि सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा आदरभावनेने यथोचीत सन्मान केला.यावेळी त्यांच्यासमवेत बिपीनभाई पटेल, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते.
लोकसभेचा घेतला कानोसा…
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार 23 ऑक्टोबर रोजी पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत शिंदे हेही असणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीची तयारी काय असणार? हे या दौऱ्यात ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर लोकसभेला महाविकास आघाडीचे काय वातावरण असेल, भाजपकडून आमदार राम सातपुते यांचे नाव समोर येत आहे, हे खरे आहे काय? याबाबत शिंदे यांनी पाटील यांच्याकडून कानोसा घेतल्याचे सांगण्यात येत आहे

More Stories
पंढरपूरचा कॉरिडॉर सर्वांना विश्वासात घेऊनच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 14 कोटी 57 लक्ष निधी वितरीत
सोलापूरचा पाणीपुरवठा: देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठका