सोलापूर: ग्रामविकास विभागाकडून पंधराव्या वित्त आयोगाचा सन 2023-24 मधील तरतूद केलेल्या निधीपैकी सोलापूर जिल्ह्यातील 942 ग्रामपंचायतींना पहिला हप्ता 44 कोटी 51 लाख बीईएएमएस प्रणालीवर प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाकडील अधिसूचनेनुसार सार्वत्रिक निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची संख्या 30 आहे. ग्रामपंचात
पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायती संख्या 49 आहे. अशा 79 ग्रामपंचायचे 3 कोटी 17 लाख 26 हजार 286 रूपये
राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरीत 863 ग्रामपंचायतींना 41 कोटी 33 लाख 73 हजार 714 रूपये वितरीत करण्यात येत आहेत. सन 2022-23 मध्ये पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर सन 2020-21,2021-22 व 2022-23 मध्ये 529 कोटी 58 लाख अनुदान प्राप्त झालेले असून त्यापैकी 329 कोटी 9 लाख खर्च झाले आहेत. अशाप्रकारे प्राप्त निधीतील 62% खर्च झालेला आहे.

सन 2022-23 मध्ये पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत पंचायत समिती स्तरावर सन 2020-21, 2021-22 मध्ये 46 कोटी 44 लाख अनुदान प्राप्त झालेले असून त्यापैकी 31 कोटी 82 लाख खर्च झाले असून 68% खर्च झालेला आहे.

सन 2022-23 मध्ये पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर सन 2020-21.2021-22 मध्ये 46 कोटी 57 लाख अनुदान प्राप्त झालेले असून त्यापैकी 31 कोटी 72 लाख खर्च झाले असून 68.11% खर्च झालेला आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *