सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात असलेल्या औषध भांडारात फक्त शिपाई हजर असल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीत आढळले आहे.
लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे व कार्याध्यक्ष मारुती जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या औषध भांडाराला सोमवारी भेट दिली. त्यावेळी भंडारात फक्त शिपाईच हजर असल्याचे दिसून आले. फार्मासिस्ट प्रवीण सोळंकी हे कामानिमित्त झेडपी मुख्यालयात गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर येथे किती कर्मचारी आहेत व बाकीचे गेले कुठे ? असा सवाल दिंडोरे यांनी उपस्थित केला. त्यावर फार्मासिस्ट सोळंकी यांनी या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असलेल्या फार्मसिस्ट जयश्री किल्लेदार यांनी फोनवरूनच रजा घेतली असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा आरोग्य विभागाच्या औषधालयातील कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यांनी कॉल कट केला. त्यामुळे मंगळवारी प्रत्यक्षात त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. ‘दिव्याखाली अंधार” असताना इतरांच्या कामाची तपासणी केली जाते, ही बाब गंभीर असून याबाबत लोकशासन पार्टी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिंडोरे यांनी दिला.

More Stories
नेहरू वसतिगृहात येईल त्या विद्यार्थ्याला प्रवेश शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांचा निर्णय
सोलापूर झेडपीच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन
आषाढी वारी काळात दोन दिवसात पंढरपुरात 32 लाख वारकरी