सोलापूर : दि. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 43 वे अधिवेशन नागपूरच्या जवाहर विद्यार्थीगृहात पार पडले. अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी कृष्णा इंगळे व उद्घाटन माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याहस्ते संपन्न झाले.
एसआरपीएफ समादेशक प्रियंका नारनवरे, माजी जिल्हाधिकारी वसंतराव खोब्रागडे, प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, माजी अप्पर आयुक्त सुधीर मेश्राम, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ,कार्याध्यक्ष गणेश मडावी, मुख्य संघटक राजाराम इंदवे, शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष बी.डी.धुरंदर, सरचिटणीस सतीश कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.महासंघाच्या नागपुरातील अधिवेशनात राज्यातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सर्व सामान्याचे प्रश्न सोडवित आहे. भविष्यात या महासंघाचे कार्य एकजुटीने पुढे घेऊन जाण्यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी महासंघामध्ये सामील व्हावे. एकजुटीने कार्य करून महासंघास पुढे न्यावे, असे आवाहन माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी कर्मचाऱ्यांना केले. खोब्रागडे, नारनवरे,गायकवाड, मेश्राम यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेमध्ये उत्कृष्ट काम करणारे शिल्लेदारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ क्षीरसागर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संविधानाची प्रत,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी खूप महत्त्वाचे योगदान क्षीरसागर यांचे आहे. क्षीरसागर हे सतत कर्मचाऱ्यांचे प्रश्नांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व इतर कार्यालयामध्ये नियमित बैठका घेऊन प्रश्न सोडवितात, याची दखल घेऊन यापूर्वी क्षीरसागर यांना ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडून गुणवंत कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.क्षीरसागर विविध सामाजिक उपक्रम राबवितात आणि क्षीरसागर यांना विविध सामाजिक संघटनाकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणून यांची दखल घेऊन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष ॲङ कृष्णा इंगळे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी नागपूर अधिवेशनामध्ये विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या निवडीबददल क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी सोलापूरातुन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे व जिल्हा परिषद शाखेचे कल्याण श्रावस्ती,उमाकांत राजगुरू ,चंद्रकांत होळकर,नरसिंह गायकवाड,मकरंद बनसोडे आदि उपस्थित होते.